top of page

- बनारसे महा ई सेवा केंद्रा चा प्रवास  -

Journey of Banarase CSC Karanja

              राज्यभरात सी एस सी सक्रीय करण्यासाठी ४ सर्व्हिस सेंटर एजन्सीज (SCA) नियुक्त करत महाराष्ट्र राज्याने सप्टेंबर २००८ पासून सी एस सी चा अंमलबजावणीला प्रारंभ केला. महसूल विभागाच्या ९६ सेवांसह भूमी अभिलेख शिधापत्रिका तसेच सेवायोजन कार्यालय सेवा अशा विविध जी टू सी ( G2C) ( गव्हर्नमेंट टू सिटीजन ) सेवा CSC मार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सेतु महाराष्ट्र या राज्य नियुक्त संस्थेने काही पावले उचलली आहेत. महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. 

             

महा ई सेवा केंद्रा ला बऱ्याच नावाने प्रसीध्दी मिळने सुरु झाले जसे सार्वजनिक सुविधा केंद्र, Common Services Center, महा सेतु, इ. आपल्या कारंजा नगरातील बनारसे महा ई सेवा केंद्र हे पहीले महा ई सेवा केंद्र म्हणुन सुरु झाले  दिनांक २६ जानेवारी, २०१० रोजी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बनारसे महा ई सेवा केंद्रा C S C, कारंजा यांचे संचालक श्री. गजानन विठ्ठलसा बनारसे यांच्या संचालना अधिन ग्राहकांना विविध सेवा व योग्य मार्गदर्शन देण्याचे काम या केंद्रा मार्फ़त केले जात आहे. पुढे २०१५ च्या लोक हक्का कायद्या अंतर्गत या केंद्रा ला common bonding मध्ये जोडले गेले व याला आता आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देण्यात आले. तसेच CSC 2.0 ने COMMON BONDING चे अस्थीत्व संपूर्ण राष्ट्रात लाभले व याव्दारे राज्यस्तरीय सेवान सोबतच राष्ट्रीय स्तरावरील सेवा देखील नागरिकांना देने सोपे झाले या मध्ये पासपोर्ट, PAN कार्ड, आधार कार्ड, इत्यादीचा समावेश झाला आहे.

             केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात. रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या    महा ई सेवा केंद्रां च्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते. काही कालावधीने नागरीकांना ऑनलाईन पध्दतीची सेवा ही जलद मिळत गेली त्यामुळे सेतु सुविधा केंद्र चे रूपांतर देखील आता महा ई सेवा केंद्रा मध्ये झाले.

bottom of page